सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

0
882

नवी दिल्ली: सुपरस्टार रजनीकांत यांना रक्तदाबात खूप अस्थिरता आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध चित्रपट सुपरस्टार अभिनेते रजनीकांत त्यांच्या अन्नात्थे (Annatthe) या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला सिनेमाच्या सेटवरील चार लोक कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळल्याने शूटिंग रद्द करण्यात आले. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह (corona negative) आली आहे.

रजनीकांत यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत…

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना कोव्हिड-19ची कोणतीही लक्षणे नव्हती, मात्र त्यांचा रक्तदाब खूप अस्थिर होता आणि यामुळे त्यांना आवश्यक उपचारांची गरज होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या केल्या जातील आणि त्यांचा रक्तदाब सामान्य होईपर्यंत त्यांच्यावर देखरेख ठेवली जाईल आणि नंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. रक्तदाब आणि थकवा सोडता त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचीही माहिती रुग्णालयाने दिली आहे.

रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याने…

ऑक्टोबर महिन्यात रजनीकांत यांनी अशी कबूली दिली होती की त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून डॉक्टरांनी त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.