@ सॅंडविच | कष्टाला वय नसतं ओ…. त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम…

0
743

सिद्धेश्वर टेंगळे – स्वामी

आपण अनेक वेळा पाहतो की छोट्या- छोट्या टपरीवर आपल्या कुटुंबाची गुजराण करत अनेक जण जीवन व्यतीत करत असतात. शक्‍यतो अशा लहान व्यवसायावर काम करणारी मंडळी अल्पसंतुष्ट असतात. असाच काहीसा प्रकार सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील वळसंग गावाजवळ दिसून येतो. कष्टाला वय नसतं कारण जगण्यासाठी कष्ट करावेच लागतात.अशीच एक स्टोरी…

श्री. राचप्पा किणगी वय वर्षे 74 आणि त्यांच्या पत्नी वय वर्षे 66 अंदाजे.
सोलापूर हुन अक्कलकोट ला जाताना वळसंग नावाचं एक छोटंसं गाव लागतं, पूर्वी रस्त्याच्या बाजूला एक छोट्याश्या खोक्या मध्ये सुमारे 20- 25 वर्षांपूर्वी मामांनी सँडविच चा व्यवसाय सुरू केला त्या वेळी 3 रुपये ला आणि अंडा सँडविच 5 रुपये ला..

ह्या रस्त्यावरून जाणारा खाद्य प्रेमी इथे थांबूनच जायचा, आम्ही देखील मागील 5 6 वर्षांपासून जाता येता येथे सँडविच खाल्लं आहे खात आहोत. खूप फेमस असलेलं हे ठिकाण पण गेल्या 2 वर्षांमध्ये रस्त्याचं रुंदीकरण सुरू झालं आणि मामांना खोक्यासकट जागा सोडावी लागली. त्यांनतर गावातील शाळेसमोर मामांनी सँडविच ची गाडी लावायला सुरू केली. लॉकडाऊन शिथिल होत असताना एकदा शाळेत जाण्याचा योग आला त्या वेळी आवर्जून आस्वाद आम्ही घेतला. पण आता वयोमाना मूळे जास्त चालणं शक्य नसल्याने
मामांनी गावातच पोस्ट ऑफिस समोर आपलं व्यवसाय पुनः चालू केला आहे.. मामांची मुलं वळसंग जवळील मिल मध्ये कामाला जातात, ह्या वयात ही कष्ट करणारे हे जोडपे. चव बद्दल सांगायचं तर एक वेगळ्याच चवीचं सँडविच, कोणत्याही भाज्यांचा अतिरेक नाही किंवा चीझ, मेयोनीज चा भरणा नाही. पण चव अशी की परत खाणारच तेही माफक दरामध्ये.. जर आपण कधी ह्या मार्गावरून जात असाल तर नक्कीच आपण ह्या ठिकाणी भेट द्यावी. सँडविच मामा नावाने हे मामा गावात प्रसिद्ध आहे.