Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

जालना : जालन्यातील पळसखेडा पिंपळे या गावी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कारण शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन ३ सख्ख्या भावंडांचा विजेचा शॉक लागून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. ज्ञानेश्वर जाधव (वय 28), रामेश्वर जाधव (वय 25) आणि सुनील जाधव (वय 18) असे या मृत तिन्ही भावंडांचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केल्या जातीय.

आज भल्या पहाटे हे तिन्हीही भाऊ रात्र पाळीची वीज असल्यानं शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.  ज्ञानेश्वर हा मोटार सुरु करण्यासाठी गेला होता. मात्र त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी दोघे भाऊ गेले असता या दोघांनाही विजेचा धक्का बसल्यानंतर ते दोघे विहिरीत पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.  आज भल्या पहाटे तिघांचेही मृतदेह विहीरीतील पाण्यात आढळून आले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. जाधव भांवंडांच्या अशा अकाली मृत्युमुळे त्यांचे आई,वडील आणि आजीच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबता थांबत नाहीय.

दरम्यान,  मयत भावांपैकी सर्वात मोठा असलेला ज्ञानेश्वर हा शेती करायचा.दुसरा रामेश्वर हा औरंगाबादमध्ये शिक्षण घेत होता.तर सर्वात लहान भाऊ सुनील हा 12 वीत शिकत होता.या घटनेनंतर मयत भावंडांच्या नातेवाईकांनी महावितरण कंपनीवर ठपका ठेवलाय. महावितरण कंपनीने रात्र पाळीची लाईन न देता दिवसभरात 6 तास जरी वीज दिली तर ही वाईट वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही असं सांगत या तिघा भावंडांच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यताही व्यक्त केलीय.या भावंडांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *