Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9  News

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृषि महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तृणधान्य पाककृती स्पर्धेतून मानवी आहारातील तृणधान्यांची उपयुक्तता सिद्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर यांच्या मार्फत आयोजित जिल्हा कृषि महोत्सव सोलापूर २०२३ च्या चौथ्या दिवशी आयोजित पाककृती स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सत्यजीत पाटील, तालुका कृषि अधिकारी मनिषा मिसाळ, रामचंद्र माळी व गणेश श्रीखंडे, लेखाधिकारी डॉ. अर्चना कसबेकर, कृषि अधिकारी वैशाली गठ्ठे, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर, आहारतज्ज्ञ ज्योती पाटील, वनिता तंबाखे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांना शुभेच्छा देऊन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले, कृषि महोत्सवात धुळे, सातारा जिल्ह्यातून स्टॉलधारक सहभागी झाले आहेत, याचा आनंद आहे. तृणधान्यांच्या अनेक पाककृतींबद्दल समाज अनभिज्ञ आहे. मात्र पाककृती स्पर्धेत विविध स्पर्धकांनी सादर केलेले पदार्थ चविष्ट व निरोगी शरीरासाठी गरजेचे आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पौष्टिक तृणधान्य व त्यावरील प्रक्रिया संधी या विषयावर कृषि विज्ञान केंद्र, मोहोळचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी तसेच, पशुसंवर्धन, दुग्ध उत्पादन व लंपी रोग व्यवस्थापन या विषयावर पशु संवर्धन अधिकारी डॉ. सत्यजीत पाटील आणि आहार तज्ज्ञ डॉ. ज्योती भास्कर पाटील, तसेच तालुका कृषि अधिकारी मनिषा मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.त

तृणधान्य पाककला स्पर्धेतील अनुक्रमे विजेत्या पुढीलप्रमाणे –प्रथम क्रमांक सौ. सुजाता अमोल डंके तिरुपती महिला बचत गट आष्टी तालुका मोहोळ, द्वितीय क्रमांक सौ. अर्चना रवींद्र रणवीरे शाहूश्री प्रो सोलापूर, तृतीय क्रमांक हसीना दस्तगीर मुलानी सोलापूर उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस सौ. सुजाता राजेंद्र नवले दमानी नगर सोलापूर उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक जय श्री शिवाजी चटके पाकणी उत्तर सोलापूर पाककृती स्पर्धेत विजेत्या महिलांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच, सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *