Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी कोरोनाचे 44 रुग्ण आढळले असून यामध्ये 31 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 109 इतकी आहे. यामध्ये 81पुरुष तर 28 महिलांचा समावेश होतो

रविवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1087 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1043 जणांचे निगेटीव्ह तर 44 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज कोणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 588 असून एकूण मृतांची संख्या 412 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 797 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 5 हजार 379 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *