Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9News Network

सोलापुर शहरातील गौरी गणपती सणाच्या निमित्ताने महिला सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडल्या होत्या. या संधीचा फायदा घेउन महिलांच्या गळ्यातील मोटार सायकलीवरील अनोळखी इसमाकडून मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरीचे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत 1, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत 2, फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत 1 असे एकूण 4 गुन्हे एकाच दिवशी घडल्याने सोलापुर शहरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होत. त्या अनुषंगाने पोलीस ठाणेस अनोळखी 2 मोटारसायकल वरील इसमांविरुद्ध गुन्हा दाखल होते.घडलेले जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत श्री. हरिष बैजल शहर पोलीस आयुक्त,सोलापुर शहर व पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा श्री. बापू बांगर यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी यांना आदेश केले होते.

त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेचे स. पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे व त्यांचे पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडीक व त्यांचे पथक हे शहर परिसरात नमूद चोरीतील अनोळखी दोन इसमाचा शोध घेत असताना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली की दिनांक 13 सेप्टेम्बर रोजी सोलापूर शहर हदीत चैन स्नेचिंग केलेले दोन चोरटे हे चैन स्नैचिंगमधील सोने विक्री करण्यासाठी त्यांचेकडे असलेल्या नंबर प्लेट नसलेल्या काळ्या लाल रंगाच्या पल्सर मोटार सायकलवरून सराफाकडे जाणार आहेत. त्या बातमी नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंके व त्यांचे पथकाने इसम नामे १ ) संतोष व्यंकट भोघीले २ ) श्रीनिवास जनार्धन माने पाटील यांना शिताफीने ताब्यात घेवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार कसून चौकशी केली असता त्यांनी दिनांक 13 सेप्टेम्बर  रोजी त्यांचेकडील चोरी केलेली दुचाकी मोटार सायकलवरून येवून एमआयडीसी पोलीस ठाणे हदीत ०१, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हदीत ०२ , फौजदार चावडी पोलीस ठाणे हदीत ०१ असे एकुन ४ गुन्हे असे जबरी चोरी केले असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडे त्यांचेकडे मिळून आलेल्या मोटारसायकल विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटार ही गुलबर्गा या शहरातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याकामी वापरलेली मोटारसायकल सोन्याचे दागिने असा 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *