Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर : महानगरपालिकेला कर स्वरूपात सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारे तथा १०२ नगरसेवकांपैकी ७० नगरसेवक निवडून देणार्‍या हद्दवाढ आणि जुळे सोलापूर भागावर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यात होणाऱ्या अन्याय विषयी नागरींकांमध्ये प्रचंड रोष असून येणाऱ्या काळात जनःशोभ वाढुन नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नेहरू नगर शासकीय मैदानावर जुळे सोलापूर हद्दवाढ भाग कृती समितीने आयोजित केलेल्या नागरी संवादात उमटल्या.

मुंबई आणि उपनगरात एकुण सहा महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी तेथील नागरीक आणि लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी सतत पाठपुरावा केला, पुण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी तेथील नागरीक आणि इंडस्ट्री असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिका अस्तित्वात आणली. जुळे सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी सर्व स्थारातुन व्यापक प्रयत्न, अभ्यासपूर्ण मांडणी आणि नगरविकास खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यास जुळे सोलापूर महानगरपालिका निर्माण होऊ शकेल असा विश्वास गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला.

बस स्टँड, रेल्वे स्टेशन पासुन ते मनुष्याला लागणार्‍या सर्व मुलभुत सोयी सुविधांची वनवा जुळे सोलापूर तथा हद्दवाढ भागातील नागरिकांना आजतागायत सोसावी लागत आहे, येथील नागरिकांना सोसाव्या लागणार्‍या नरकयातना थांबवण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून व्यापक लोकजागृतीसह जनआंदोलन येणाऱ्या काळात उभारणार असल्याची माहिती वेक अप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली. अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या जुळे सोलापूर महानगरपालिका झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, ह्या दमदार घोषणांनी उपस्थितांमध्ये उत्साह वाढला. जुळे सोलापूर व हद्दवाढ भाग कृती समितीच्या वतीने नेहरु नगर शासकीय मैदानावर आयोजित नागरी संवादात राहुल मांजरे, आनंद पाटील, युसुफ पिरजादे, संदीप साळुंखे, आनंद हुलगेरी, प्रसाद गोटे, कलबुर्गी, सुजित कोरे, संदीप फुलारी, विजय इंडिकर, दत्ता म्हेत्रे, प्रविण राऊत, रा.ज. कांबळे, भरत धनशेट्टी आदी नागरीकांनी आपला सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *