Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

बालाजी अमाईन्स लिमिटेड, बालाजी फाउंडेशन आणि ड्रीम फाउंडेशन यांच्या वतीने यूपीएससी व एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा रविवारी हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी पार पडला.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, आयकर उपयुक्त प्रसाद मेनकुदळे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, सोलापूर आकाशवाणीचे केंद्र प्रमुख राजेंद्र दासरी ,बालाजी अमाईन्स व बालाजी फौंडेशन चे राम रेड्डी ,संयोजक काशिनाथ भतगुणकी यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांना आणि त्यांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास आर्ट ऑफ लिविंगचे शेखर मुंदडा, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, कुमार करजगी, झिरो बझेट पॉलिटिक्स तेलंगणा चे पी,माधव रेड्डी,पैलवान उमेश सूळ,राजेंद्र टापरे, नगरसेविका संगिता जाधव ड्रीम फाउंडेशनच्या संचालिका संगीता भतगुणकी आदी उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रम उद्घाटन करण्यात आले,
सोलापूर जिल्ह्यातील UPSC व MPSC परीक्षा उत्तीर्ण मा,शुभम जाधव शिंदेवाडी ,ता, माळशिरस, मा,श्री जयजीतसिंह उमाप,काटेगाव ता,बार्शी यांचा UPSC ऊत्तीर्ण झाल्याबद्दल ,मा,चैतन्य अनंत दिवाणजी लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल तर MPSC ऊत्तीर्ण झालेले मा,हर्षल सूळ उपजिल्हाधिकारी, मा,अनुप यादव उपजिल्हाधिकारी, रणजित कोळेकर ,तहसीलदार,मा,मयूर लाडे उपशिक्षणाधिकारी, मा,नितेश कदम नायब तहसीलदार, कु,सोनाली भाजीभाकरे यांचा आई वडिलांना सह सहपरिवार सत्कार मानाचा फेटा,शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मा,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, प्रसाद मेनकुदले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला,
पोलिस अधिकारी सातपुते यांनी सर्व ऊत्तीर्ण गुणवंतांचा गौरव करून पुढील प्रशासकीय कारकीर्द साठी शुभेच्छा दिले,मोठी ध्येय व प्रचंड मेहनत यातून यश नक्की मिळते,

मा,प्रसाद मेनकुदळे उपायुक्त यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास,सातत्य,ध्येय,मेहनत ,परिश्रम यातून अधिकारी पद मिळते सर्वांच्या मेहनतीने सामाजिक जबाबदारी मिळते असे ही ते म्हणाले,

स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ड्रीम फाउंडेशनच्यावतीने केले जात आहे.‌ अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले.

Upsc उत्तीर्ण शुभम जाधव यांनी आपला जीवन प्रवास कथन केला,मागील 4 वर्ष यश,अपयश यातून यावर्षी मला हे उत्तुंग यश मिळाले यामध्ये माझ्या आईवडिलांना व सहकार्य केलेल्या सर्व गुरुवर्य यांचे योगदान आहे,प्रशासन येण्याची प्रचंड इच्छा हेच माझे यशस्वी होण्याचे रहस्य आहे असे ते म्हणाले,

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले.तर आभार मा,धनराज पांडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगिता भतगुणकी ,धीरज चपेकर, अमोल गोगावे,सोनाली,स्मिता मेलशेट्टी,वैभव होसाळे, शंकर बोलकोटे,अमन मुल्ला,अमृता माने यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *