Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

उच्च उत्पादन क्षमतेच्या ज्वारीच्या ‘फुले- रेवती’ या जातीच्या बियाणांचे वाटप कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले. या बियाणातून शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ कदम यांच्या हस्ते नियोजन भवन येथे भरडधान्य योजनेअंतर्गत ज्वारी बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मनपा गटनेते चेतन नरोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ कदम यांच्या हस्ते कृषी यांत्रिणीकरण योजनेतून प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी शिवानंद चनबसप्पा बिरादार या शेतकऱ्याला ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.

बियाणे वाटप लाभार्थी शेतकरी
विठ्ठल गरड, रामचंद्र गरड, ओंकार वाघमोडे, रखमाजी गायकवाड, मारुती गायकवाड, नारायण पोतदार ( सर्व रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) आणि श्रीमती रेखा हजारे, कुसुम साठे, चंदना आवताडे, वालिका डफळे, जयश्री चटके या सर्व महिला शेतकरी (रा. पाकणी, ता. उत्तर सोलापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *