Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

  • श्री क्षेत्र चिंतामणीची कथा :

ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे.
आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.

गणपतीने गणराजाला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेसुद्धा म्हणतात.

  • श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर :

हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. चिंतामणीची ही मूर्ती स्वयंभू पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.

गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले.
१०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते.

चिंतामणी हे श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या २ मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. वयाच्या २७ वर्षी श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे.

थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा येथेच सिध्दी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.

  • पूजा आणि उत्सव :

दर्शनाची वेळ सकाळी ६ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते रात्री १०
मुख्य उत्सव श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते, तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते आणि भाविक येथे गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

माधवराव पेशवे यांनी शेवटचे दिवस इथे व्यतीत केले. त्यांनी मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केले होते. त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रामाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा-माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो.

  • जाण्याचा मार्ग :

पुण्यापासून थेऊर अवघे २२ किलोमीटर आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर लोणी मार्गे आपण थेऊरला जाऊ शकतो.

  • जवळची इतर दर्शनीय स्थळे :

थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगररंगांमध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४० किमी

श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर पुणे-दौंड मार्गावर केडगांव येथे आहे. अंदाजे अंतर ४३ किमी

थेऊरजवळील लोणीपासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे. येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४ ते ५ किमी

थेऊर फाट्याओअसून जवळच पुणे-सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे. अंदाजे अंतर १३ किमी

वाघोली-केसनंद या मार्गावर वाडेबोल्हाई मंदिर आहे. अंदाजे अंतर १३ किमी

पुणे-नगर मार्गावर तुळापुर येथे भीमानदीकाठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचे स्मारक आहे. अंदाजे अंतर २१ किमी

||गणपती बाप्पा मोरया||

अतिशय महत्त्वाचे : सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

All Rights Reserved
© ✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.
संग्रहित दिनांक : २३ सप्टेंबर २०१५

॥ ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण….॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *