Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

‘स्वेरी हे असे एक महाविद्यालय आहे की, जे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अध्यापन सुविधा प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्वेरी अनेक उपयुक्त शैक्षणिक उपक्रम राबवते ही बाब अत्यंत महत्वाची आहे. मी बर्‍याच शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या आहेत पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या स्वेरी सारख्या शैक्षणिक संस्था अतिशय दुर्मिळ आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी प्राध्यापकांच्या माध्यमातून केले जाणारे सांघिक परिश्रम पाहून विद्यार्थ्यांना मिळणारे यश हे अपेक्षितच वाटते. यामुळेच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यात स्वेरीला प्रचंड यश मिळाले आहे.’ असे प्रतिपादन पुणे येथील ‘डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’ चे कुलगुरू डॉ.सी.पी. रामानारायणन यांनी केले.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला कुलगुरू डॉ.सी.पी. रामानारायणन यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी स्वेरीतील शैक्षणिक सुविधा पाहून गौरवोद्गार काढले. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता व एमबीएचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील त्यांनी स्वेरीच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या कामगिरीचा आलेख सदर केला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक दर्जा उंचावण्यासाठीचे उपक्रम, कार्यपद्धती, मिळालेली मानांकने, संशोधनातील गरुड भरारी, विद्यार्थ्यांना करिअरसाठी असलेल्या विविध संधी याबाबत डॉ. रामानारायणन यांनी माहिती जाणून घेतली तसेच प्राध्यापकांशीही त्यांनी संवाद साधला. प्राध्यापकांनी चौकसपणे विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी योग्य आणि समर्पक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी स्वेरी कॅम्पस मधील विविध विभागाबरोबरच ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्रास (आरएचआरडीएफ) भेट दिली व तेथे सुरु असलेल्या संशोधनाचा आढावा घेतला तसेच वर्कशॉप, अभियांत्रिकी व फार्मसीमधील विविध विभाग, प्लेसमेंट विभाग यांची पाहणी करून माहिती घेतली.

पुढे बोलताना कुलगुरू डॉ. डॉ.रामानारायणन म्हणाले की, ‘स्वेरीच्या स्थापनेपासून ते आजतागायतचा डोलारा पाहता खरंच या यशामागे प्रचंड परिश्रम असल्याचे दिसून येते. स्वेरीतील आदरयुक्त संस्कृती व विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील आदरयुक्त संबंध या बाबी खरंच उल्लेखनीय आहेत. स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’चे देशातील प्रत्येक महाविद्यालयाने अनुकरण केले पाहिजे. स्वेरीतील आदरातिथ्य पाहून मी भारावून गेलो’. यावेळी त्यांनी स्वेरीच्या सोलार रूफ टॉप प्रकल्पाचेही खूप कौतुक केले.यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी रामानारायणन व कन्या जननी रामानारायणन व जावई जी. विग्नेश तसेच स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, यांच्यासह स्वेरीतील अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *