Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

काँग्रेस पक्षात शुकशुकाट,राष्ट्रवादीत किलबिलाट आणि शिवसेनेत सगळेच निवांत अशी आघाडीतील घटक पक्षांची स्थिती झाली असताना सोलापूर शहर काँग्रेस मध्ये मात्र “गडगडाट” पहावयास मिळाला.कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यास नेतृत्वाला वेळ नाही किंवा नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये ताळमेळ नाही अशी द्विधा अवस्था सोलापूर शहर काँग्रेसची झाली आहे.

काँग्रेस भवनातील दोन – तीन दिवसात घडलेल्या घडामोडींचा कानोसा घेतल्यावर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आल्याचे बिंग फुटले.सोलापूर शहरातील मध्य मतदार संघात कार्यक्षम आमदार प्रणितीताई शिंदे नेहमीप्रमाणे विविध उपक्रम राबवून मतदारांचे पांग फेडत आहेत.वेळ मिळालाच तर शहर उत्तरमध्ये ” तीन पट्टा ” भागात जाऊन जोरदार भाषणबाजी करून आपण प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष आहोत हे सिद्ध करीत आहेत.याशिवाय खास वेळ काढून जळगाव,नासिक,बुलढाणा,परभणी जिल्हा दौरा करून काँग्रेस मध्ये चैतन्य आणत आहेत.

केंद्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांना ज्या तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्यानी मोठे केले,त्यांना मात्र दोघांनीही चक्क वारयावर सोडले आहे.याची खमंग चर्चा खुद्द काँग्रेस भवनातच चालू आहे.

डावपेच आणि राजकीय भूकंप –

दोन दिवसापूर्वी दक्षिण सोलापूरचे काँग्रेस नेते डाॅ.बसवराज बगले यांनी आपल्या दक्षिण विधानसभा मतदार संघातील शहरी भागातील सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांची बैठक बोलावली,ही खबर मिळताच शहर काँग्रेस मध्ये जणू ” राजकीय भूकंपच ” झाला.नेते खडबडून जागे झाले,आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत तयारी आणि चाचपणीसाठी डाॅ.बगले यांनीच का बैठक बोलावली याची खमंग चर्चा झाली.ही खबर एका प्रदेश कमिटीच्या वरिष्ठ नेत्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पर्यंत धाडली.शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना कान पिचक्या मिळाल्या,तात्काळ चक्रे फिरली.

डाॅ.बगले यांना कार्यालयात बोलावून शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी बंद खोलीत तासभर चर्चा केली.शुक्रवारी बोलावलेली बैठक लांबवण्या ऐवजी मंगळवारीच त्वरीत घेण्याचे शहर अध्यक्ष वाले यांनी ठरविले,ती बैठक पार पडली.प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिक आणि कार्यकर्ते यांची बैठक घेण्याचे फर्मान शहर अध्यक्ष वाले यांनी सोडले.सी बलाॅकचे अध्यक्ष अरूण साठे आमि देवीदास गायकवाड यांनी बैठका लावावेत.असेही यावेळी ठरले.

शहरात ग्रामीणचा काय संबंध- मिस्त्री –

मात्र या बैठकीला समन्वयक डाॅ.बसवराज बगले हेच उपस्थित नंव्हते,याचा फायदा घेत बाबा मिस्त्री यांनी तोंडसुख घेतले, बगले हे दक्षिण सोलापूर ग्रामीणचे आहेत.त्यांनी बैठक बोलावण्याचा संबंध काय ? असा मुद्दा उपस्थित केला.

डाॅ.बगले हे दक्षिण सोलापूर मतदार संघातील काँग्रेसचे एक प्रमुख आहेत,जुळे सोलापुरात भाजपचे मताधिक्य असताना डाॅ बगले यांनी 10 ते 12 उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.अशीही चर्चा यावेळी झाली.पदे भोगून तुम्ही सगळे शांत बसल्याने त्यांनी पक्षहितासाठी केले असेल,तुम्हाला काम करायला कुणी अडवले आहे का ? असा सवाल शहराध्यक्ष वाले यांनी केला.त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील बुथ रचना करून प्रतिनिधींची यादी त्वरीत द्यावी.जनतेत जाऊन काम करावे.असा आदेशही वाले यांनी दिला.

डाॅ.बगले हे शहर काँग्रेसचे पदाधिकारी नसताना सुध्दा पक्ष संघटनेत सक्रीय झाले आहेत.असे असले तरी पडद्यामागे मात्र वेगळेच काही तरी शिजत आहे.असा तर्क दक्षिण विधानसभा मतदार संघात काढला जात आहे.शहर – ग्रामीण हा वादाचा मुद्दा समोर आला आहे.

एकूणच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शहरी भागात डाॅ.बगले यांनी ” डाव ” टाकला.आणि पक्षात ” पेच ” निर्माण झाला.सगळे कामाला लागले.सुस्तावलेल्या काँग्रेसला जुळे सोलापुरात कार्यरत करण्याची किमया करून त्यांनी ‘ चैतन्य ‘आणले हे मात्र नक्की.

योग्य वेळी बोलेन – डाॅ.बगले –

शहर अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीतील अनुपस्थिती बाबत प्रतिक्रिया विचारली असता,मी अचानक गुलबर्गा येथे आलो आहे.शहर अध्यक्ष यांना याची कल्पना दिली आहे.पक्षाचा आदेश मान्य करूनच बैठक घेण्याचे निश्चित झाले आहे.अध्यक्षांनी दिलेले आदेश योग्य आहेत.बाकीचे योग्य वेळी सविस्तर जाहीरपणे बोलेन असे डाॅ.बसवराज बगले म्हणाले.मात्र नेमका डावपेच काय आहे असे विचारले असता, पक्षकार्यात कसलाही डावपेच नाही,पण मतदार संघातील शहर आणि ग्रामीण मतभेदाबद्दल आत्ताच प्रतिक्रिया देणार नाही,असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *