Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर शहराकरिता आवश्यक इतकी लस उपलब्ध नसल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, लस उपलब्ध होतास सर्वांना दिली जाईल अशी माहिती पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली

मागील काही दिवसापासून सोलापूर शहर परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेऊन केंद्राच्या आरोग्य मंत्रालय लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत त्या पद्धतीने पालिके मार्फत सोलापूर शहर आणि परिसरामध्ये केंद्रावर लसीकरण होणे अपेक्षित आहे पण लस मोठया प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्रवर गर्दी होत आहे तरी नागरिकांनी आरोग्य केंद्रात गर्दी करून नये महापालिकेच्या माध्यमातून लस उपलब्ध झाल्यावर आपल्याला प्रसिद्धी माध्यमातून सागितलं जाईल याची नोंद घ्यावी.सोलापूर शहरा करिता आवश्यक असणाऱ्या अडीच लाख लसीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. शासनाकडून लस उपलब्ध होताच लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लस दिली जाईल, त्यापूर्वी कोणत्याही लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करु नये असे आवाहन पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *