MPSC निकाल | पंढरपूरची कन्या रोहिणी झाली नायब तहसीलदार

0
69

Big9news Network

आंबे तालुका पंढरपूर येथील रोहिणी गायगोपाळ यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. आज एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला असून त्यामध्ये तिची या पदावर निवड झाली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून जिद्द, कष्ट व अभ्यासाच्या बळावर त्यांनी ही बाजी मारली आहे.

यापूर्वीही त्यांची नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून निवड झाली होती व त्या सध्या मंगळवेढा नगर परिषदेमध्ये प्रशासन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत त्यांचे शालेय शिक्षण आंबे येथील प्राथमिक व जिजामाता प्रशाला येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले असून शाळेमध्ये सुद्धा आदर्श विद्यार्थिनी म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून पुणे विभागाचे मा. शिक्षक आ. दत्तात्रय सावंत सर यांनी त्यांचे अभिनंदन केले.