‘पॉझिटिव्ह’ आहात का ..! वाचा डॉ. दांपत्याने शेअर केला अनुभव

0
12334

महेश हणमे /9890440480

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. सोलापूर शहर परिसरातील आजपर्यंत 2 लाख 10 हजार 21 जणांनी कोरोना वर मात केली. वेळेवर घेतलेले उपचार ,सकारात्मक मानसिकता, योग्य आहार यामुळे अनेक जण बरे झाले. शहरातील एका डॉक्टर पती-पत्नीने, योग्य मॅनेजमेंट करून कुटुंबातील सर्वांची यातून सुटका केली. डॉ.प्रवीण ननवरे, डॉ.मंजुषा ननवरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्व अनुभव सांगितला आणि अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्यात शब्दात…

अखेर कोरोनाने गाठलेच…

वेळीच मॅनेजमेंट आणि सहीसलामत सुटका.

पत्नी डॉक्टर मंजुषा शासकीय सेवेत. मी क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांच्या संपर्कात. बहिण शिक्षक. सर्वचजण रुग्ण संपर्कात. अशातच लहान मुलाला ताप आला. लगेच अलर्ट झालो. घरातील सर्वांना isolate केले. टेस्टिंग करून घेतले.मंजूषाची टेस्ट positive आली. लस घेतली असल्यामुळे तिच्यामध्ये लक्षणे अगदी च सौम्य होती. त्यामुळे इन्फेक्शन जाणवलेच नाही. हळूहळू कुटुंबातील सर्वानाच लक्षणे दिसू लागली. त्या आधीच तिच्या कुटुंबातील (सासुरवाडी) लोकांनाही कोरोणा ची लागण झाली होती. एकाच वेळी दोघांचे ही कुटुंबे करोनाच्या विळख्यात आली. लागलीच निदानात्मक चाचण्या करून औषधोपचार सुरू केले. कोविड फिजिशियन डॉक्टर विशाल गोरे, डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी, डॉक्टर शेटे यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त शेड्युल मधूनही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.त्यांचा मी खूप ऋणी आहे. लागलीच isolate झाल्याने व्हायरल लोड वाढला नाही. आईला शुगर बीपी असल्याने थोडं टेंशन होते. मात्र सोबत आयुर्वेदिक औषधांची जोड दिली. आहार, पथ्य तंतोतंत पालन केले. ऑक्सिजन लेव्हल वर सतत लक्ष ठेवून राहिलो. माझा सिटी स्कोर 12/25 (50 % lung involvement) असताना देखील एक दिवस ही ऑक्सिजन लेवल कमी आली नाही. हे केवळ छंद म्हणून जोपासलेल्या सायकलिंग चे व आजवर जपलेल्या फिटनेस चे फलित. मी ठणठणीत राहिल्याने घरातील सर्व व्यक्तींची व्यवस्थित काळजी घेऊ शकलो व संपूर्ण कुटुंब करोणाच्या विळख्यातून सहिसलमात बाहेर काढले. आईला तेवढे पोस्ट कोविड शुगर वाढली. डॉक्टर विशाल गोरे व डॉक्टर भास्कर पाटील यांनी व्यवस्थित मॅनेज करून कुठलही कॉम्प्लिकेशन होऊ दिले नाही.

मी हा मेसेज समाजातील करोणामुळे भयभीत झालेल्या लोकांसाठी शेअर करीत आहे. वेळीच निदान, ताबडतोब आयसोलेशन व लवकरात लवकर उपचार या जोरावर तुम्ही करोणा वर सहज मात करू शकाल.
#Think_positive_be_negative

 

🟢 मला काही होत नाही हा गैरसमज पहिला डोक्यातून काढून टाका. मीही त्याच गैरसमजात होतो. पण सध्याचा strain वेगळा असून कुठल्याही वयोगटाच्या माणसाला सोडत नाही. तरुण 35 ते 45 वयोगटातील लोक व्हेंटिलेटर जाताना दिसत आहेत. लहान मुलंही positive होत आहेत.तरी सेफ आहेत. त्यांची चिंता करू नये.

🟢 घरात कोणालाही लक्षणे दिसताच त्या व्यकीचे ताबडतोब आयसोलेशन खूप गरजेचे आहे. ज्यांच्या घरी वेगळ्या संडास, बाथरूमची सोय नाही त्यांनी लगेच टेस्ट करून गव्हर्मेंट च्या ठिकाणी quarantine व्हावे व आपले कुटुंब वाचवावे.

🟢 सध्याच्या लाटेत खूप वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. केवळ सर्दी, ताप, खोकला, कणकण, याशिवाय जुलाब हे देखील कोरोनाचे लक्षण असू शकते. उगीच उन्हात फिरल्याने, थंड पाणी पिल्याने ,जास्त काम केल्याने असे होत असेल म्हणून मनाची भालवण करीत आजार अंगावर काढत बसू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी टेस्ट करण्यास सांगितल्यास न घाबरत टेस्ट करा.

🟢 कोरोनाचे निदान झाल्यानंतर पहिले पाच दिवस खूप महत्त्वाचे आहे. या काळामध्ये वायरस रेप्लीकेशन हेऊ द्यायचे नाही. म्हणजे त्यांची संख्या वाढू द्यायची नाही. त्यासाठी इतरांपासून आयसोलेशन, पूर्ण आराम,गरम पाणी, आयुर्वेदिक काढा, आणि डॉक्टरांची antiviral व इतर औषधे वापरावी. मेडिकल मधून दोन गोळ्या आणून काम भागवून चालत नाही.

🟢 ऑक्सिजन लेव्हल 95 च्या खाली येणे हे अलार्म साइन आहे. अशा रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांना दाखवून पुढील तपासणी करून घ्यावी. शुगर बीपीचा त्रास असेल तर ताबडतोब ॲडमिट व्हावे .

🟢 सुरुवातीचे तीन दिवस पेशंटला ताप कमी झाल्यावर जेवण द्या. नंतर चव आणि वाढत जातो त्यावेळेस पेशंट जेवत नाही. अशावेळी हुलग्याचे माडगे मुग आणि भाताची खिचडी नारळाचे पाणी इलेक्ट्रॉल पावडर पचायला हलके पदार्थ द्यावे.

भूक जास्त लागेल रिकव्हरी होईल त्यावेळेस भिजवलेले बदाम अक्रोड आणि अंजीर द्यावे. सकाळी दोन अंडी द्यावी. सफरचंद डाळींब व लिंबू, संत्री ही फळे द्यावी.

,🟢 Remdisivir च्या काळ्या बाजाराला बळी पडू नये. ऑक्सिजन लेव्हल 90 च्या खाली आली तरच remdisivir घेणे योग्य. माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती remdisivir शिवाय करोनामुक्त झालेल्या आहे.

🟢 14 दिवसानंतर आपली ऑक्सिजन लेवल चांगली असल्यास आपण रोगमुक्त झाल्याचे लक्षण समजावे. ज्याना फुफ्फुसांची involvolment आहे त्यांनी एक महिना औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू ठेवावे.

🟢 या आजाराचे थैमान रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे न घाबरता सर्वांनी लस घ्यावी. ज्यानी लस घेतली तेहि पॉझिटिव्ह आले असले तरी त्यात ऍडमिट व्हायची वेळ खूप कमी जणांना आली. लसीकरणाच्या ठिकाणी पॉझिटिव पेशंट तपासणीसाठी आलेले असतात. त्या गर्दी मध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप आहेत. घरी आल्यावर आपल्याला ताप येतो आपण लसीमुळे आहे म्हणून अंगावर काढतो मात्र काही दिवसानंतर करोनमुळे झाल्याचे लक्षात येते. लसीमुळे आपण पॉझिटिव्ह झालो असा आपला गैरसमज होतो. हे टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर मास्क घालून जाणे इतरांच्या संपर्कात न येणे सोशल डिस्टन्स ठेवणे आणि घरी आल्यावर हात sanitize करून आंघोळ करून घरात येणे. याचे कटाक्षाने पालन व्हायला पाहिजे.

🟢 लॉकडाऊन मुळे घरात बसून असलेल्या लोकांना सतत मृतांचे आकडे बघून निराशा येत आहे. जे admit आहेत त्यांना व्हाट्सअप ग्रुप मधील भावपूर्ण श्रद्धांजली चे मेसेज काळजाचा ठोका चुकवित आहेत. मनोबल खच्चीकरण करत आहेत. त्यामुळे हे मेसेज काही दिवस बंद करावे. त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.घरात बसलेल्या लोकांनी टीव्ही न पाहता पुस्तके वाचावीत लहान मुलांमध्ये रमावे.

🟢 आता सरकारला दोष देणे, डॉक्टरांना मारहाण करणे , या गोष्टी समाजाने सोडून द्याव्या. डॉक्टर लोक यासाठी आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवत आहे. मुठभर लुटारू डॉक्टरांना वगळून इतरांचा आदर करा.राजकीय नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी मिळून काम केले व सुजाण नागरिकांनी सहकार्य केले तर करोणाला हद्दपार करणे अवघड नाही.

डॉ.प्रवीण ननवरे