सोलापुरात ४५७ महिलांनी मोफत पाहिला *’द केरला स्टोरी’ चित्रपट*

0
32

Big9 News

भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव समर्थ बंडे आणि सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज होनमाने यांच्या वतीने ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट महिलांना मोफत दाखविण्यात आला. यावेळी सोलापुरातील महिलांनी व कॉलेज तरुणींनी चित्रपट पाहण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद दाखवला.

गुरुवारी हा चित्रपट पाहण्यासाठी एकूण ४५७ महिला व मुली उमामंदिर थिएटर येथे आल्या होत्या. यावेळी महिलांनी हिंदू धर्म की जय, नफरत नहीं हम प्रेम के आदी है, गर्व से कहो हम हिंदूवादी है, जय श्री राम, भारत की बेटियां अपने चरित्र से प्रेम करें, और लव्ह जिहाद जैसी गंदगी को हमेशा के लिये खत्म करें अशा घोषणांचे फलक हातात धरुन लव्ह जिहादला विरोध करत घोषणाबाजी केली. हिंदू पारंपारिक वेशामध्ये आलेल्या या महिलांचे व मुलींचे हळदी कुंकू लावून थिएटरमध्ये स्वागत करण्यात आले.

भारतामध्ये विशेषतः केरळ राज्यात अनेक हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून, माथी भडकावून आणि त्यांची मती भ्रष्ट करुन त्यांचे धर्मांतरण केले जाते व लव्ह जिहादच्या माध्यामातून त्यांच्या आयुष्याशी खेळले जाते. अशाच प्रकारे सुमारे ३२ हजार पेक्षा जास्त मुलींना फसवून सीरिया आणि येमेन सारख्या देशांमध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. यावर जनेतेचे प्रबोधन व्हावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधात हिंदू समाज आणि हिंदू महिला जागा झाला आहे. हिंदू तरुणी आणि महिला लव्ह जिहादच्या विळख्यात अडकल्या जाऊ नये आणि त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हा प्रबोधनात्मक चित्रपट मोफत दाखविण्यात येत आहे असे यावेळी आयोजकांनी यावेळी म्हणले.

हा चित्रपट यशस्वीरित्या दाखविण्यासाठी माजी नगरसेविका रेखाताई बंडे, माजी महापौर सुमन मुदलियार, माजी नगरसेविका नरसूबाई गदवालकर, रेवती मुदलियार, अश्विनी चव्हाण, वैजयंती कुलकर्णी, रोहन मराठे, अनुप कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.