Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13 News Network

 

सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते आदेशाचे वितरण

राज्यातील पहिली मदत

पुत्रवियोगाने आईला अश्रु अनावर…

कोरोना काळात मृत्यु झालेल्या आपल्या मुलाचे निधनानंतर शासनाकडून मिळणार ५० लक्ष रूपयाचा आदेश घेताना कंत्राटी कर्मचारी दिवंगत प्रशांत ओहोळ यांची आई आशा ओहोळ व वडिल परमेश्वर ओहोळ यांना अश्रु अनावर झाले. आईने आदेश मिळताच आपले अश्रु मोकळी वाट केली.. सिईओ यांचे दालनात पाठीमागील बाजूस जाऊन ढसाढसा रडल्या….!

सोलापूर – कोरोना काळात मृत्यु झालेल्या कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांना राज्यातील पहिला ५० लाख रूपयाची मदत शासनाने मंजुर केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते माता आशा ओहाळ व पिता परमेश्वर ओहाळ यांना मंजुरीचा आदेश प्रदान करणेत आला. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने या साठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्यात कंत्राटी कर्मचारी यांना देणेत आलेली ही पहिली मदत आहेत.
जिल्हा परिषदेत आज सिईओ यांचे दालनात माढा तालुक्यांतील पालवण ग्रामपंचायतीचे डाटा एन्ट्री आॅपरेटर प्रशांत ओहोळ यांचे वारसास मदतीचा आदेश सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते प्रदान करणेत आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, राज्य ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाची पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ मिटकल, माढा तालुक्यांतील पालवण ग्रामपंचायतीचे अतुल क्षीरसागर, माजी सरपंच परमेश्वर पाटील, आई आशा ओहोळ, वडिल परमेश्वर ओहोळ, भाऊ तेजस ओहोळ, महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, प्रशासन अधिकारी जहीर शेख, आपले सरकार सेवा केंद्रांचे महावीर काळे उपस्थित होते.
ग्रामपंचायत विभागाचे प्रशासन अधिकारी जहीर शेख, आपले सरकार चे जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे यांनी प्रस्ताव पाठविणे साठी प्रयत्न केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या प्रयत्नाला यश
…………………..
मंत्रालयातील वित्त 4 येथील वित्त उपसचिव पी. ए. देशमुख यांनी कोरोना कालावधीत मयत झालेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सानुग्रह अनुदानाचा पहिला आदेश महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. कोरोना कालावधीत मयत झालेल्या बांधवांचे कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी मागील दीड वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने कोरोना कालावधीत मयत झालेल्या बांधवांच्या प्रस्तावा बाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा सुरू होता.मुदतीत सादर करण्यात आलेले प्रस्तावास शासनाची मान्यता नसल्याने सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात येता येणार नाही असे वित्त विभागाकडून सुचविण्यात आले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्याप्रमाणे त्यांचे ओएसडी हनुमंत पाटील यांच्या मदतीने 2 जून 2021 पर्यंत मुदतवाढ करून घेतली. त्याप्रमाणे राज्यभरातून वित्त विभागाकडे 197 प्रस्ताव आले त्यानंतर ग्रामसेवक संघाच्या वतीने पाठपुरावा करत असताना सदर सानुग्रह अनुदानासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे सुचवण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसेवक संघाच्या वतीने सध्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांना समक्ष भेटून निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे ग्रामसेवक संघाच्या प्रयत्नाला यश येऊन आज राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्याकडे वित्त विभागाचे उपसचिव पीए देशमुख यांनी राज्यभरातील त्रुटीची पूर्तता करून आलेल्या सर्व प्रस्तावांना आज आदेश संबंधित जिल्हा परिषदेकडे वितरित केले.

कंत्राटी कर्मचारी यांना मदतीचा हात – सिईओ दिलीप स्वामी
……………….
कोरोना काळात कंत्राटी कर्मचारी यांचे कडून खुप मोठ्या प्रमाणावर कामे करून घेणेत आली. काम करीत असताना मृत्यु पावलेले पहिले कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना ५० लक्ष रूपयाची मदत करणेत येत आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले .

पाठपुराव्यास यश – राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील
……………………..
कोरोना मध्ये मृत्यु पावलेले कर्मचारी यांचे साठी दहा कोटी तरतूद राज्य शासनाने केली होती.
सोलापूर जिल्ह्यातील आठ कर्मचार्यांनी मुदतीत प्रस्ताव सादर केले होते. त्या पैकी पालवण तालुका माढा येथील संगणक परिचालक कै.प्रशांत ओहोळ यांचा प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तत्कालीन गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता.तो मंजूर होऊन सानुग्रह अनुदान ५० लाख रुपये चा आदेश आज देणेत आला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी या आदेशाची अंमलबजावणी करून नस्ती अर्थ विभागाकडे पाठविली आहे.

कंत्राटी कर्मचारी यांचे शासनाकडून दखल – सचिन जाधव
… ……………………..
राज्यात कोरोना काळात कंत्राटी कर्मचारी यांचे कडून जोखमीची कामे करून घेणेत आली. परंतू या मध्ये जीवावर उदार होऊन काम करणारे कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांना राज्यातील पहिली ५० लक्ष रूपयाची मदत तत्परतेने देणेत आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग व ग्रामसेवक संघाने विशेष पाठपुरावा केला. सिईओ दिलीप स्वामी यांची देखील या साठी मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *