रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड

0
364

सोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली.

पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

शुक्रवारी राजाभाऊ सरवदे यांचा 65 वा वाढदिवस असून पक्षाने ही मोठी जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोलापुरातील त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

राजाभाऊ सरवदे यांची दलित चळवळीतील अभ्यासू आणि लढवय्या नेता अशी ओळख आहे.