Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर सीईओ स्वामी यांनी एक पद एक वृक्ष हे अभियान सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून नंतर त्यातील मोजकीच झाडे जगतात असा अनुभव सर्वत्र येत असल्याने सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्याने एक झाड लावून ते जगवावे या उद्देशाने “एक पद एक वृक्ष” हे अभियान सोलापूर जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली. या उपक्रमाला प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

जिल्हा परिषद आरोग्य तांत्रिक कर्मचारी पतसंस्थेने आपल्या सभासदांना प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे 321 सभासदांच्या खात्यावर वृक्षारोपणासाठी 32100 रुपये जमा केले आहेत. दिनांक 5 जुलै 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते ही रक्कम जमा करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बिराजदार, व्हाईस चेअरमन सतीश राऊत, मानद सचिव गणेश शिंदे, प्रमोद जावळे, फिरोज शेख, चंद्रकांत पवार, जितेंद्र साळुंखे, रामलिंगय्या स्वामी, आरोग्य संघटनेचचे राज्याध्यक्ष महेश जाधव,श्रीमती मंगल काळे, विजया राऊत, शशीकांत सुलगडले, मकरंद गायकवाड, विठ्ठल सोलनकर, उपस्थित होते.

यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना 10,20,30 वर्षे अश्वासीत पदोन्नती मंजूर केल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *