मध्यवर्ती शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी शेखर फंड, उपाध्यक्षपदी अनिल मस्के

0
33

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी शेखर फंड,
उपाध्यक्षपदी अनिल मस्के

सोलापूर – छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात नूतन पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदू रक्षक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखर फंड यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अनिल मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या छोटेखानी झालेल्या कार्यक्रमास माजी उपमहापौर नाना काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, उद्योजक मनीष देशमुख , नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक सुनील कामाटी, शिवसेनेचे प्रताप चव्‍हाण , दत्‍तात्रय वाणकर, माजी नगरसेवक जगदीश पाटील, राजेश काकडे, माऊली पवार, ज्ञानेश्वर सपाटे, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे व तर मावळते अध्यक्ष निरंजन बोदुल आदींची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी 2020 वर्षीच्या मिरवणुकीमध्ये ढोल पथक व लेझीम खेळाचं उत्तम सादरीकरण केल्याबद्दल शहरातील सर्व मंडळातील सदस्यांचा महामंडळाचे माजी अध्यक्ष अमोल केकडे यांनी स्वखर्चातून दिलेल्या शिवमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश देशमुख यांनी केल. आभार प्रदर्शन माऊली पवार यांनी केल.
ही बैठक संपन्न करण्यासाठी देविदास घुले यांनी परिश्रम घेतले.