गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात ; मराठा समाजाचा स्तुत्य उपक्रम

0
15

श्री.छञपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउदेशिय मंडळ बाळे,केगाव, खेडच्या वतीने 10वी, 12वी गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच गुरुकमल मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड.श्री.धनंजय (आबासाहेब) माने. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक, चार्टर्ड अकाऊंट्ट(C A) मा.श्री.विनोद  भोसले,शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रतापसिंह कांचन पाटिल, शिवसेनेचे व मराठा समाजाच्या अडिअडचणी मध्ये मदत करणारे श्री परमेश्वर (आबा) सावंत,केगावचे उघोगपती गोपीनाथ डेव्हलपरचे मालक श्री काशीनाथ दळवी,प्राची महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ निताताई गवळी,खेडचे श्री उमाकांत शिंदे यांचे मार्गदर्शन सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांना लाभले

कार्यक्रमाला उपस्थिती ज्येष्ठ नागरिक श्री खंडेराव चव्हाण,मंडळांचे अध्यक्ष श्री नवनाथ पवार, केगावचे श्री मच्छिंद्र दळवी,मंडळाचे युवा प्रमुख श्री गणेश सरवळे,सहखजिनदार श्री सतिश शिंदे, सदस्य श्री सुनील सुरवसे, श्री प्रशांत जाधव, श्री गोविंद जाधव, श्री संतोष शितोळे, श्री धर्मराज भोसले, श्री आबा काळे, श्री धनाजी सातपुते, श्री कॄष्णा थोरात, निंबाळकर सर्व समाज बांधव, भगिनी, विद्यार्थी, पालक,मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळांचे सचिव श्री यशवंत लोंढे, प्रस्तावना मंडळाचे खजिनदार श्री विश्वास चव्हाण व आभार प्रदर्शन मंडळाचे सहसचिव श्री शक्तीसागर सुरवसे यांनी केले.