MH13 News Network
सोलापूर :- मुंबई उच्च न्यायालयात ई-फायलिंगचे आदेश आल्याने बार कौन्सिलने त्याबाबतची सर्व यंत्रणा महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व वकील संघांना पुरवणेचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणी करिता पावले उचलले जात आहेत. याबाबत केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देखील भरीव तरतूद करण्याचे जाहीर केले आहे, त्या तरतुदीनुसार बार कौन्सिलच्या निर्णयाला हातभार लावावा, अशी विनंती बार कौन्सिलच्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री किरण रिजूजू यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. त्यावेळी केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे हेही उपस्थित होते.
या वेळी बार कौन्सिलचे विद्यमान चेअरमन एड मिलिंद पाटील, भूतपूर्व चेअरमन ऍड मिलिंद थोबडे,उपाध्यक्ष ऍड.संग्राम देसाई बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ऍडव्होकेट जयंत जायभावे सदस्य ऍड.आशिश देशमुख आदी उपस्थित होते.