Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना बुद्ध पौर्णिमेनिमीत्त पाच फूट उंचीच्या शंभर बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या आहेत.

       बुद्ध पौर्णिमेनिमीत्त  पाच फूट उंचीच्या फायबर मेटलपासून बनविलेल्या शंभर बुद्ध मूर्तीची , शंभर भव्य रथांतून मिरवणूक काढण्यात आली. या शंभर बुद्ध मूर्ती नाशिक जिल्ह्यातील  शंभर गावांना दान करण्यात आल्या. नाशिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून हा बुद्ध मूर्ती प्रदान सोहळा पार पाडण्यात आला.

        दोन दिवसांवर बुद्ध पौर्णिमा आली असून शहरात उत्सवात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून नाशिक (Nashik) शहरातून हजारो बांधवांसह बुद्धमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शंभर गावांमधील 500 श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभाग झाले होते. सम्राट अशोक जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा निमित्त 23 एप्रिल ते दोन मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामनेर शिबीर घेण्यात आले. या शिबीरांत शंभर गावातील प्रत्येकी पाच उपासक श्रामनेर झाल्यास सुमारे 500 श्रामणेरांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *