Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना मंगळवारीसकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. उजमा याकूब पत्तेवाले (रा. पंजाब तालीम) असे अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. घरगुतीवादातून अंगावर पेट्रोल ओतून त्या महिलेने पोलीस आयुक्तालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेसताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिसकर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *