Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

सोलापूर कोर्ट वाॅरंटच्या भितीने ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुना विडी घरकुल येथे घडली. गौस हबीब रहेमान शेख (वय ३५, रा. जुना विडी घरकुल) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मयत गौस हबीब शेख यांचे कौटुंबिक न्यायालयामध्ये केस चालू आहे. त्यांनी वाॅरंटच्या भितीने शनिवारी राहत्या घरात घराच्या दरवाज्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी सायंकाळी मिळून आला. त्यास खाली उतरवून नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *