Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर पुणे रोडवर मडके वस्ती भागात दुचाकीस्वार मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.आज गुरुवारी सायंकाळी सदर घटना घडली.

घरी येत असताना सोलापूर शहरातील बाळे भागातील मुलीचा दुर्दैवी अंत झाला. आज गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.MH 13 Dk 6109 या ऍक्टिवा गाडीचा नंबर आहे.Mh46 AR 6188 कंटेनरच्या धडकेत तिचा दुर्देवी अंत झाला.

बार्शी रोड वरील नामदेव सोसायटी भागात राहत असणारी वैष्णवी संतोष सरवदे वय वर्ष साधारण 20 ही मुलगी संगमेश्वर कॉलेज मध्ये शिकत होती. एक्टिवा गाडी वरून घरी येत असताना मडके वस्ती परिसरात कंटेनरच्या धडकेत तिचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मुलीचे वडील हे सोलापुरातील एका खाजगी कंपनी मध्ये मेकॅनिकल कामास आहेत. सरवदे कुटुंबात आई ,भाऊ असे इतर सदस्य आहेत.
कंटेनर चालक धडक देऊन फरारी झाला होता. परंतु पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सावळेश्वर टोल नाक्याजवळ कंटेनर चालकास ताब्यात घेतले असून कंटेनर जप्त केला आहे अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
या परिसरात वारंवार अपघात होत असून याठिकाणी अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक होत होती. त्यामुळे अनेक जण अपघातात बळी गेले आहेत परंतु नॅशनल हायवे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिक माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *