सायकल बँक | मुलाच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य कर्मचाऱ्याची ‘सायकल’ भेट

0
25

मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजादी महोत्सव व रक्षाबंधन भेट म्हणून एका विद्यार्थिनीस सायकल भेट देण्यात आली. मोहोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाने अशा पद्धतीने सामाजिक जाणीव जपली.

श्री दिलीप स्वामी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी आझादी अमृत महोत्सवनिमीत्त व रक्षाबंधन भेट म्हणून मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल बँकेस  सायकल देणेबाबत आवाहन केलेनुसार प्राथमिक आरोग्य कुरुल ता. मोहोळ येथील श्री विकास भीमराव भांगे, प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी यांनी मुलगा ‘मुकुल’ याच्या वाढदिवसानिमीत्त सायकल दिली.

 

याबबत  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भांगे यांचा सत्कार व कौतुक केले व श्री भांगे यांनी मुलाचे वाढदिवसानिमीत्त सायकल भेट दिले तसेच आपले जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी योगदान दिले तर सायकल बँकेत मोठया प्रमाणात सायकल जमा होतील असे सुचित केले.


सदर प्रसंगी डॉ शितलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी , श्री जावेद शेख, महिला बाल विकास अधिकारी,डॉ अनिरुद्ध पिंपळे ,माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ बगाडे मॅडम, डॉ दुधभाते अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ श्रीकांत कुलकर्णी,निवासी वैदयकिय अधिकारी, डॉ विशाल बंडगर , डॉ डी जी घाटुळे वैदयकिय अधिकारी, श्री अविनाश गोडसे ,प्रशासन अधिकारी श्री शशिकांत नरगिडे, श्री सयाजीराव बागल, श्रीमती पुष्पा भड, श्री आनंद साठे, श्री बाळासाहेब पालखे उपस्थित होते.