गडकरी साहेब, आमच्याकडे लक्ष द्या ! दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0
158

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर येथील सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वडकबाळ येथील सीमा नदीवर व टाकळी येथील भीमा नदीवर पूलाजवळ बॅरेजेस बांधण्याचे काम लवकरात लवकर बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य माजी सभापती गोपाळराव कोरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सोलापूर विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.


केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी बॅरेजेस बांधण्यासंदर्भात घोषणा केली होती. आणि त्यासंबधीत कार्यपूर्तता करण्यासाठी संबधीत अधिकाऱ्याना सुचना दिल्या होत्या. परंतु वडकबाळ बॅरेजेस व टाकळी बॅरेजेस बांधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परीयोजना, सोलापूर यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. राष्ट्रीय महामार्ग- 19 (नवीन NH-52) प्रशासनास विनंती करीत आहोत की बरेजेस बांधण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.असा इशारा यावेळी देण्यात आला.


या आंदोलनात भीमा-सीना संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास लोकरे, मदानी पुजारी, आमसिद्ध पुजारी, सरदार नगारे, केरबा वाघमारे भीमाशंकर बगले बाळासाहेब बगले, विकास कांबळे, चेतन बिराजदार, शेखर बंगाळे, राजशेखर बगले, यांच्यासह वडकबाळ, हत्तुर, मंद्रूप या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.