Breaking | वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पोलीस कर्मचाऱ्यास चिरडले ; जागीच मृत्यू

0
1953

मंगळवेढा/प्रतिनिधी

एका वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मंगळवेढ्यातील एका पोलिसाला चिरडले आहे. ही घटना शिरशी ता.मंगळवेढा येथे आज सकाळी 10 वाजता घडली आहे. या मध्ये पोलिस कर्मचारी गणेश सोलनकर मयत झाले आहेत. डी.वाय.एस.पी.  पाेलीस स्टेशनला हजर झाले असुन गुन्हा दाखल प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे पाेलीस सुत्रांनी सांगितले.

मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी – शिरशी मार्गावर हॅटसन डेअरी जवळ ही घटना घडली असून आज लोक अदालत असल्यामुळे पोलीस कर्मचारी गणेश प्रभू सोनलकर वय 32 हे समन्स बजावणी गेले होते. गावचे पोलीस पाटील यांना डेअरी येथे येण्यास सांगून सोनलकर हे वाट पाहत थांबले असताना समोरून भरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला त्यांनी हात केला.

गाडीत वाळू असल्याने टेम्पो चालकाने मात्र गाडी थांबविण्याऐवजी थेट सोनलकर यांच्या अंगावर घातली. अंगावरच घातल्याने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. टेम्पो चालकाने पोलीस कर्मचारी गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) यांचा जीव घेतला असल्याने मंगळवेढा तालुकासह सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासनाला चांगला हादरा बसला आहे.