Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

*जय किसान तर्फे करजगी येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा*
जय किसान कंपनी कडून 75 वा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी जय जवान जय किसान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले 1965 साली तत्कालीन पंतप्रधान लाल बाहदुर शात्री यांनी दिलेला नारा ‘जय जवान जय किसान ‘ या विचाराने जय किसान कंपनी कडून जो सैनिक आपली सीमेवरची सेवा पूर्ण करून आता प्रगतशील शेतकरी आहे अश्या सेवा निवृत्त सैनिक श्री सूर्यकांत पुजारी यांच्या सन्मान करण्यात आला व जय किसान सौभाग्य 14.28.0 हे खत भेट म्हणून देण्यात आले.

दरम्यान, शेतकऱ्यांना माती परीक्षण , सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल राखून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसा घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले .

या वेळी कंपनी चे विपणन अधिकारी श्रीधर शिंदे , संकेत भोज तसेच मुख्य वक्ता म्हणून निवृत्त कृषी पर्यवेक्षक श्री नरेंद्र कल्ल्याणशेट्टी . करजगी गावचे सरपंच मल्लिकार्जुन तोडकरी गावातील खत विक्रेते शहा कृषी भांडार , व पंडित कृषी केंद्र आणि
प्रगतशील शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *