Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी : माढ्यात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंतीचे पुजन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे , उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत, काँग्रेस नेते दादासाहेब साठे, आनंदराव कानडे, राजेंद्र चवरे, चंद्रशेखर गोटे , शहाजी साठे ,दत्तात्रय अंबुरे अशोक लूणावत स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा,डॉ.सुभाष पाटील,शंभू साठे आदि मान्यवर उपस्थित होते.जयंतीनिमित्त संग्राम मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सायंकाळी 7.30 वा. शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात घेण्यात आला.

दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व सायंकाळी 7.00 वाजता विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, 21 फेब्रुवारी सायंकाळी 7.00 वाजता खंडू डोईफोडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे जागर करणारे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा पार पाडण्यासाठी संस्थापक अध्यक्ष – बाबासाहेब मस्के,अध्यक्ष दर्शन कदम, उपाध्यक्ष आकाश भांगे,
सचिव शंभू कदम,सुरेश भांगे,आदित्य भांगे,बाळकृष्ण गायकवाड,मारूती भांगे,जिवन ढेकळे,निशांत पालकर,पिंटू भांगे,संतोष गलांडे,विजय कांबळे, प्रकाश भांगे,विवेक मुळे,योगेश भांगे ,दिगंबर भांगे,अक्षय भांगे,स्वप्निल भांगे,शुभम भांगे, शुभम चवरे,अशोक सुळे, निलेश चवरे,विजय सस्ते,अमर भांगे,यश मस्के,अजिंक्य भांगे, प्रविण गलांडे,सागर भांगे,समर्थभांगे,मंगेश मस्के,अनिकेत सुरवसे,उमेश मस्के,शिवराज भांगे, निलेश भांगे,
अमोल भांगे,अनिकेत चव्हाण,बबलु भांगे, स्वप्निल भांगे,
रोहित घळके,प्रदिप गलांडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डी.व्ही चवरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *