चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी

0
481

Big9news Network

चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी

सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाचे 62 रुग्ण आढळले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.11 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 62 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 30 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 1026 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 964 निगेटीव्ह तर 62 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 4 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 1 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू…
मयत झालेली व्यक्ती भीम नगर शेळगी परिसरातील 70 वर्षाची महिला असून 28 डिसेंबर रोजी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 9 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29,813 असून एकूण मृतांची संख्या 1462 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 305 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 28,046 इतकी आहे.

लसीकरण..
15 ते 18 वर्षातील 47 हजार 181 पात्र व्यक्ती आहेत.
18 वर्षावरील 6 लाख 85 हजार 882 व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.

महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत नागरिकांनी आजारपण अंगावर काढू नये. वृद्धांची काळजी घ्यावी. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे, मास्क वापर करावा अशा सूचना देण्यात येतात.