सोलापुरात येताय ! रेल्वे स्टेशन व एसटी स्टँडवर होतेय कोरोना टेस्ट …

0
699

MH13NEWS Network

सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाची तपासणी मध्ये वाढ करण्यात आली आहे. आजपासून रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड येथे बाहेर गावी वरून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे.तसे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडे अगोदर कोरोना तपासणी केलेली सर्टिफिकेट असतील किंवा त्यांनी लस घेतली असेल किंवा एक महिन्याच्या अगोदर अँटीबॉडीची तपासणी केलेली सर्टिफिकेट असेल तरच त्यांना सोडण्यात येईल नाहीतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येईल. यासंदर्भात आज आयुक्त पि. शिवशंकर यांनी रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड येथे पाहणी केली.

यावेळी रेल्वे प्रशासन व एसटी प्रशासनाच्या अधिकार्‍यांशी पुढील उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा केली व सूचना दिल्या. एसटी स्टँड येथे प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तीन ते चार टीम येथे उपलब्ध करण्यात येणार आहे जसे प्रवासी वाढतील तसे तपासणी याठिकाणी करण्यात येणार आहे.तसेच नागरिकांना सूचना आहे की आपण प्रवास करताना आपले कोरोनाची तपासणी करूनच प्रवास करावा असे आवाहन आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले आहे.यावेळी डॉ. मंजिरी कुलकर्णी,डॉ. संतोष थिटे तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.