Crime Alert | बादशहा म्हणत काढले पिस्तुल ; मनोरंजनाचा टाकला व्हिडिओ ,पहा काय झाली अवस्था

0
275

MH13 News Network
काही युवक कमी रहदारीचे ठिकाणी काल्पनिक मारामारी व त्यातून झालेल्या भांडणात एकास पिस्तूलमधून गोळी घालत असल्याचा नाट्य रूपांतरित व्हिडीओ ‘इन्स्ट्राग्राम’ द्वारे व्हायरल झाला होता. सद्यस्थितीत युवकांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे. चित्रपटातील गाणे याच्यावर व्हिडिओ बनवणे याचे फॅड सुरू झाले आहे.

सदर व्हिडीओ मधील प्रसंगात दाखवलेले पिस्टोल यामुळे त्याचे खरे/खोटेपणाबाबत शंका निर्माण झाली होती. समाजावर या उदात्तीकरणाचा वाईट परिणाम होण्याची शक्यता होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सदर व्हिडीओमधील घटनास्थळ हे नवघर पोलीस ठाणे, मुंबई हद्दीतील नवीन झालेला- टाटा स्मशानभूमी रोड असलेचे दिसून आले असता वपोनि सुनील कांबळे सो, पोनि संजय लोंढे यांनी तात्काळ संबंधित युवकांचा शोध घेणेस तडीपार पथकाचे फौ. लामखडे व पथक यांना आदेश दिले.

त्यानुसार फौ. लामखडे व पथकाने व्हिडिओवरून त्यांचा शोध सुरु केला.
गुप्त बातमीदा्रांकडून त्यांची ओळख पटवून सापळा कारवाईचे आयोजन करून लागलीच सदर युवकांस ताब्यात घेतले.

त्यांचेकडे कसून चौकशी केली. व्हिडिओ बनवताना वापरलेले पिस्टोल मिळवले असता, ते खेळण्यातील प्लास्टिकचे असलेचे निष्पन्न झाले. सदर मुले ही अल्पवयीन असून मुलुंड पश्चिम व पूर्वेकडील झोपडपट्टी भागातील आहेत.
चौकशीअंती त्यांचा वरील व्हिडीओ बनवण्यामागचा उद्देश ‘मनोरंजन’ असल्याचा दिसून आला.तसेच त्यांना यातील दुष्परिणामाची जाणीव नसलेचे निदर्शनास आले.
सबब, त्यांचे पालकांना संपर्क करून समुपदेशन करून व ताकीदवजा समज देऊन सोडण्यात आले.

पालकांनीसुद्धा कुटुंबातील मुले मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असा सूर समाज माध्यमातून निघत आहे.

सदर कारवाईत फौ. लामखडे, सफौ. लांडे, पोह. ठाकूर, पोशि. शिंदे,बच्छाव,सांगळे,दंडगव्हाळ, लोखंडे यांनी सहभाग घेतला.