सायकल बँक | CEO स्वामींच्या आयडियाला मोठा प्रतिसाद ; 75 सायकलींचे वाटप..

0
156

पंढरपूर पंचायत समिती अधिकारी व कर्मचार्‍यांकडून विद्यार्थीनींना 75 सायकलचे वाटप जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आयोजन

पंढरपूर – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या सायकल बँक उपक्रमांतर्गत पंचायत समिती पंढरपूरच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी विद्यार्थीनींना 75 सायकलचे वाटप केले.
पंचायत समितीच्या आवारात या देशाच्या
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.


ग्रामीण भागातील गरींब मुलींना शाळेमध्ये ये जा करण्याची सोय व्हावी. या उद्देशाने 75 सायकलचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते व जिल्हा जलसंधारण अधिकारी पंडीतराव भोसले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
याप्रसंगी दिलीप स्वामी यांनी या उपक्रमाचे कौतूक करीत आणखी जास्तीत जास्त सायकली देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी दिलीप स्वामी यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. एकनाथ बोधले, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, सहायक गट विकास अधिकारी अमृत सरडे,उप अभियंता राजकुमार पांडव, उपअभियंता संजय लवटे पशुसंवर्धन विकास अधिकारी प्रियंका जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहाजहान तांबोळी, प्रफुल्ल माळी, अशोक नलवडे, महेश वैद्य, मच्छिंद्र मस्के, अतुल लोटके, प्रमोद जावळे, सुंदर नागटिळक, अजय भोसले, प्रशांत आगावने, प्रल्हाद मोरे, दत्तात्रय गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.