Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर : हिप्परगा तलावात बुडून डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू

हिप्परगा तलाव परिसरात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

आदित्य अजित चव्हाण (वय 21, रा. आंबाजोगाई) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. केगाव येथील डेंटल कॉलेजमध्ये आदित्य पहिल्या वर्षाला शिकायला होता. काल गुरुवारी सायंकाळी आदित्य त्याच्या मित्रांसमवेत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेला होता. तलाव परिसरात फिरताना अचानक पाय घसरून आदित्य पाण्यात पडला. गाळामध्ये अडकल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. आज शुक्रवारी सकाळी आदित्यचा मृतदेह सापडला.

त्याच्या घरी आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे.

हिप्परगा तलाव परिसरात गेल्यानंतर आदित्यने त्याच्या मोबाईलवरून आईसोबत संवाद साधला होता. घटनेची माहिती कळल्यानंतर त्याचे कुटुंबीय, नातेवाईक सोलापुरात दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *