सोलापूर,दि.29 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवार दि. 30 एप्रिल 2022 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर ते पहिल्यांदाच मोहोळ विधानसभा मतदारसंघात येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे
असा आहे दौरा..
शनिवार, दि. 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता लोकनेते कारखाना मैदान, मौजे अनगर, ता. मोहोळ येथे आगमन. सकाळी 10.00 वाजता शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. या ठिकाणी अनगर नगरपंचायतीच्या स्थापने निमित्त कृतज्ञता मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली. यावेळी विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील हे उपस्थित होते.
दुपारी 12 ते 1 वाजता राखीव. दुपारी 10.30 वाजता श्रीक्षेत्र अरण, ता. माढा येथे आगमन व सावता परिषद मेळाव्यास उपस्थिती. असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.