डिजिटल सोलापूर | महापालिकेच्या सेवा होणार मोबाईल ॲपवर उपलब्ध..

0
255

सोलापूर महापालिकेच्या सेवा होणार मोबाईल ॲपवर उपलब्ध….

सोलापूर–दि.18-11-2021
सोलापूर महापालिकेच्या संगणक विभागाच्या वतीने नागरिकांना सेवासंबंधीचे अर्ज ऑनलाईन करण्यासाठीची सुविधा MySolapur या Android Mobile App द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मोबाईल ॲपचे लॉन्चिंग आज महापौर कार्यालय येथे महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.ऑनलाइन अर्ज भरण्या करिता MySolapur App हे Google Play Store मधून डाऊनलोड करुन घेता येईल.मोबाईल ॲपमधे खालील सेवांचा आजला समावेश करण्यात आला आहे.


1) कर भरण्याची सुविधा व ना हरकत प्रमाणात मिळेल
2) सौर उर्जा व जलपुनर्भरण प्रकल्प राबविला असल्यास कर आकारणी मधे सूट मिळणेकामी अर्ज
3) जन्म -मृत्यु दाखले, बाळाच्या नावाची नोंद
4) घरी जन्म अथवा मृत्यु झालेली नोंदणी
5) नर्सिंग होम परवाना
6) विविध व्यवसायांसाठीचा परवाना
7) बांधकाम परवाना
8) हुतात्मा स्मृती मंदिर हॉल बुकिंग
9) तक्रारी अर्ज
10) घरगुती स्पेटी टँक
वरील ऑनलाईन अर्ज कसे भरावयाचे , त्याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत माहिती देण्यात आलेली असून भरावी लागणारी फी देखील ऑनलाईन भरता येईल.यामुळे नागरिकांनी या ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त वापर करुन सध्याच्या कोविड महामारीच्या काळात गर्दी टाळून म.न.पा. प्रशासनास सहकार्य करावे. असे आव्हान महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी केली. यावेळी संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, मतीन सय्यद बिरुदेव सरवदे, आशिया शेख,वसीम सय्यद,शिवचलप्पा गोटूरु आदी मान्यवर उपस्थित होते.