Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

दिवाळी म्हणजे चैतन्य ,दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण.! हिंदू समाजामध्ये दिवाळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन मुहूर्त असून देशभरात आणि देशाच्या बाहेर ही लक्ष्मीचे पूजन करण्यात येईल.

हिंदू पंचांगानुसार, दीपावलीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला म्हणजेच ०४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. दीपावलीच्या दिवशी रिद्धी-सिद्धी दाता गणेशाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबतच धनाची देवता कुबेर, देवी सरस्वती यांचीही पूजा या दिवशी केली जाते. दिवाळीत गणेश-लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी ०६.०९ ते ८.२० पर्यंत असणार आहे.

 

लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळ
सायंकाळी ०६ वाजून ०९ मिनटांपासून रात्री ०८ वाजून २० मिनटं
कालावधी: १ तास ५५ मिनिटे
प्रदोष काळ: १७:३४:०९ ते २०:१०:२७
वृषभ कालावधी: १८:१०:२९ ते २०:०६:२०

 

या मंत्रांचा जप करून लक्ष्मीची पूजा करा –
ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।

ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।

ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।

Diwali 2021 Lakshmi Puja Timing: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. या दिवशी व्यापारी त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये आणि सामान्य लोक त्यांच्या घरात श्रीलक्ष्मीची (Diwali 2021 Lakshmi Puja Timing) पूजा करतात. सर्वत्र मोठ्या आनंदाने लक्ष्मीचे पूजन करण्यात येते. व्यापारी, संस्था, छोटी मोठी दुकाने, कार्यालय याठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात येते.

 

लक्ष्मी-गणेशाची पूजा करण्याची पद्धत
लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचा घट घेऊन त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. लक्ष्मी देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, ठेवावी. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी.

यासोबतच माता लक्ष्मीच्या श्री सूक्ताचे पठण करावे. या पद्धतीने कुबेर आणि माता सरस्वतीची पूजा करावी. सर्व देवतांची पूजा केल्यानंतर हवन करावे. यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *