Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9News Network

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे. युवकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टी, मौजमजा करण्याऐवजी रक्तदान करावे. आपल्याबरोबर मित्रांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात झाली. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, एडस निर्मुलनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, निरामय आरोग्य धामच्या सीमा किणीकर, नागेश गंजी यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ब्लड बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.जाधव यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राचा आढावा घेऊन एड्स बांधितांसाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेवून सामाजिक संस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासकीय दवाखान्यात सामान्य नागरिक येत असतात. शासकीय दवाखान्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने युवकांनी रक्तदान शिबीरात सामील होऊन रक्तदान करावे. खाजगी ब्लड बँकेने रक्तसंकलनातील 10 टक्के रक्त शासकीय दवाखान्याला देणे बंधनकारक आहे. कोठेही रक्तदान शिबीर झाले तरी रक्ताच्या बॅगा शासकीय रक्तपेढीला द्याव्यात.

देह विक्री करणाऱ्या महिलांना रेशन कार्ड मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सामाजिक संस्थांनी उर्वरित महिलांना रेशनकार्ड मिळवून द्यावे. दिले रेशन कार्डावरील विशेष प्रवर्ग हा दर्जा हटविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. त्यांना शासकीय धान्य हे शासनाचे कर्तव्य आहे. याबाबत सर्वांनी नियोजन करून व समन्वय साधून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

एचआयव्ही बाधितांची संख्या वाढू नये, यासाठी जागृती करावी. एचआयव्हीच्या तपासण्या वाढविण्याविषयी श्री. जाधव यांनी सूचना केल्या.

अपर पोलीस अधीक्षक श्री. जाधव म्हणाले, खाजगी रक्तपेढ्यांनी व्यावसायिक बनू नये. गोरगरिबांच्या सेवेला त्यांनी रक्ताचा पुरवठा करावा. रक्तासाठी नागरिकांची अडवणूक होऊ नये.

डॉ. ढेले यांनी सांगितले की, महाविद्यालयांनी रक्तदान शिबीरे आयोजित करून रक्त संकलन करावे. सर्वांनी शासकीय रक्त पेढीमध्ये जास्तीत जास्त रक्त संकलित करण्यासाठी प्रयत्न करावेत. देह विक्रय करणाऱ्या महिलांना रेशनकार्ड, आधारकार्ड मिळण्यासाठी संस्थांनी प्रयत्न करावे. एचआयव्ही बाधितांची औषधे सीएसआरमधून घेण्यास मान्यता देण्यात आली.

श्रीमती किणीकर यांनी संस्थांच्या अडचणी मांडल्या. संस्थेमधील कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर करण्याची मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *