Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

बिपीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी पेठ एस व्ही सी एस हायस्कूल जवळील पालवरची शाळा येथे विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. जेमिनी बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बिपीन पाटील यांना दीर्घायुष्यासाठी मंडळाच्या वतीने महापूजा करण्यात आले. याप्रसंगी अशोक जेनुरे, सिद्राम यलदड्डी, लिंगप्पा मोलनकर, विजू कोळी, विजय गोरकल, रविराज कलशेट्टी, प्रशांत कलशेट्टी, मल्लू कोळी, संतोष कोळी, शिव मंदकल, प्रवीण कैरमकोंडा, अक्षय कलशेट्टी, राघवेंद्र जेऊर आदीच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आले. यानंतर पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.


यासह भवानी पेठेत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या कडून महानगरपालिके तर्फे मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आले असून भवानी पेठ व घोंगडे वस्ती परिसरातील गरजू व गोर गरिबांसाठी सोलापुर मनपातील महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिलांना रोजगार मिळावे यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश पाटील, संजय साळुंखे, शशी थोरात, अक्षय अंजिखाने यांच्या उपस्थितीत शिलाई मशिनचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, बिपीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या प्रभाग 3 मधिल गरजू, होतकरू व विधवा महिलांसाठी महापालिकेतील महिला व बालकल्याण विभागातर्फे मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आले आहे. मी गटनेता असल्याने जास्तीतजास्त मशीन घेऊन आमच्या प्रभागात वाटप केले आहे. याचे सर्व बिल हे मार्च आगोदर मंजूर करून घेतले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही प्रभागात मशिन वाटप केले आहे. अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिले. याप्रसंगी ज्योती अन्नम, सुरेखा अळगुंडगी, चनवा सोन्नद, अंबिका नरोटे, लक्ष्मी होटकर, सीमावती रानसर्जे, संगीता मेणसे, रेणुका मड्डी, रेश्मा साखरे आदींसह इतर लाभार्थ्यांना 15 मशीन वाटप करण्यात आले असून उर्वरित दोन दिवसात सर्वाना शिलाई मशीन देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिले आहे. यावेळी भागातील नागरिक व बिपीन पाटील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *