Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

उमाबाई श्राविका विदयालय व क. महाविदयालयामध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी प्राचार्य श्री. सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शना खाली साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक म्हमाणे लाभले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्या बद्दल माहिती सांगितली. तसेच त्यांच्या सत्य, अहिंसा व असहकार या मार्गाने स्वातंत्र्य कसे मिळवून दिले याबद्दल ही माहिती सांगितली.

महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार म. गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त श्राविका विदयालय व क. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गांधी विचार रुजू व्हावेत म्हणून विविध उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये स्वावलंबन, आई – वडिलांना मदत, हस्तव्यवसाय, नीटनेटकेपणा इ. उपक्रम ऑनलाईन घेण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब पौळ यांनी केले.प्रशालेचे कलाशिक्षक श्री. प्रविण कंदले यांनी फलक लेखन केले.यावेळी या कार्यक्रमासाठी प्रा. प्रतिभा कंगळे,प्रा. गणेश लेंगरे, प्रा. अर्चना कानडे ,प्रा. कल्याणप्पा हायगोंडे , प्रा. सोमनाथ राऊत , श्री. प्रविण कंदले,कु. शुभदा कोन्हेरीकर, सौ. भक्ती कालेकर, सौ.पूजा जोशी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *