Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूरचे माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्या मातोश्रीचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले. आज दुपारी दोन वाजता भरणेवाडी येथे अंत्यविधी होणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी समाज माध्यमातून दिली.

दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे आज सकाळी निधन झाले आहे. आज दुपारी २ वाजता इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे अंत्यविधी होणार आहे.
लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक सुख दुःखात यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेल्या आईचा आधार आज हरपला आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *