मासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

0
180

सांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती येथे बुधवारी 24 ऑगस्ट रोजी घडली आहे.पंधराव्या वित्त आयोगामधून पाईपलाईन केलेल्या कामाचे बिल मंजुर करुन घेण्यासाठी लाच मागितली होती.

या दोघांना घेतलं ताब्यात …

सुरेश सुधाकर फासे (ग्रामसेवक, ग्रामपंचायत पारे, ता. सांगोला) व श्रावण बाजीराव घाडगे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, सांगोला) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार हे सांगोला तालुक्यातील पारे ग्रामपंचायतीचे सदस्य असून पारे गावातील गोरडवस्ती येथे पाईपलाईनचे काम पंधराव्या वित्त आयोग सन 2020- 21 अंतर्गत मंजुर झाले आहे. सदरचे काम हे पारे ग्रामपंचायतीस मिळाले होते. त्याअनुषंगाने सदर कामाची सर्व जबाबदारी पार पाडण्याकरीता पारे येथील सरपंच यांनी लेखी आदेशान्वये यातील तक्रारदार यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार वरील नमूद काम पूर्ण झाल्यानंतर सदर कामाचे बिल मंजुर होवून मिळण्यासाठी तक्रारदार यांनी पाठपुरावा केला.