पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे खुन प्रकरणी तिघांची उच्च न्यायालयाचा ‘निकाल’

0
403
Judge gavel, scales of justice and law books in court

*पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे खुन प्रकरणी तिघांची उच्च न्यायालयात निर्दोष मुक्तता*
मुंबई दि. पंचायत समिती कुंभारी गटाचे तत्कालीन सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या खुन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 1) प्रमोद उर्फ किंगभाई प्रकाश स्वामी रा. रामवाडी सोलापूर 2) जगदीश उर्फ पिंटु रत्नाकर कान्हेरीकर रा. मसरे गल्ली सोलापूर 3) प्रदीप उर्फ दिपक प्रभाकर मठपती रा. शेळगी सोलापूर यांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

यात हकिकत अशी की, दि13/10/2014 रोजी रात्री 10.00 वा चे सुमारास कुंभारी शिवारातील माचर्ला मिलजवळ जात असताना तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जगदेव कटारे उ.व. 55 वर्षे रा. कुंभारी ता. द. सोलापूर व नबीलाल ईस्माईल शेख रा. विडी घरकुल सोलापूर यांचेवर अनोळखी इसमांनी तलवारी व सत्तुर सारख्या हत्याराने प्राणघातक हल्ला करून गुरुनाथ कटारे यांचा खून करून नबीलाल शेख याचा खुन करण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद शिवलिंग शंकर पारशेटटी याने वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने व पुणे येथील सीआयडी पथकाने केला व दि. 1/12/2014 रोजी प्रमोद उर्फ किंगभाई प्रकाश स्वामी, जगदीश उर्फ पिंटु रत्नाकर कान्हेरीकर व प्रदीप उर्फ दिपक प्रभाकर मठपती यांना अटक करुन रमेश सिद्रामप्पा पाटील यांच्या सांगण्यावरून खुन केल्याचे निष्कर्ष नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते

सदर खटल्याची सुनावणीत सरकार पक्षाने सत्र न्यायालयामध्ये एकुण 18 साक्षीदार तपासले होते व तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम आर देशपांडे यांनी दि. 31/01/2020 रोजी तिन्ही आरोपींना खुनाच्या आरोपाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती

शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये आरोपींनी अ‍ॅड रितेश थोबडे व अ‍ॅड प्रियल सारडा यांचेमार्फत अपिलात धाव घेतली होती

अपिलाचे अंतिम सुनावणीवेळी अ‍ॅड महेश जेठमलानी यांनी आपल्या युक्तीवादामध्ये प्रत्यक्षदर्शी सबळ पुरावा आरोपींविरुद्ध नाही. सहआरोपीच्या न्यायालयासमोरील कबूली जबाबावरुन केवळ शिक्षा कायद्याने देता येणार नाही. एका आरोपीचा कबुलीजबाब नोंदवताना कायदेशीर अनिवार्य बाबींची पूर्तता केली गेली नसल्याचे सांगितले.न्यायाधीशांनी कबुलीजबाबावेळी आरोपीस विचारलेल्या प्रश्नांचा विचार करता आरोपीस कबुलीजबाब देण्याचे परिणामांची जाणीव होती असे म्हणता येणार नाही असे सांगितले.

हत्यारजप्तीचे पुरावे सरकार पक्षाने शाबीत केले नसल्याचे सांगुन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले, ते ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहीते डेरे व श्रीमती शर्मिला देशमुख  यांच्या खंडपीठाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली

यात आरोपीतर्फे अ‍ॅड महेश जेठमलानी, अ‍ॅड रितेश थोबडे, अ‍ॅड प्रियल सारडा व अ‍ॅड राजकुमार मात्रे यांनी तर सरकार पक्षातर्फे पी. पी. शिंदे यांनी काम पाहिले.