Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

बेरोजगार उमेदवारांसाठी 24 फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली .

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट,कोणतीही पदवी, टेलिकॉलर, इलेक्ट्रीशीयन अशा प्रकारची एकुण 900 पेक्षा जास्त रिक्तपदे 6 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अधिसुचीत केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री.जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *