Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर, दि.3जून

– सिव्हिल पाठीमागील मिडल क्लास हौसिंग सोसायटीतील हिलिंग हॅण्डस् फिजिओथेरपी, ऑस्टिओपॅथी व आयुर्वेद सेंटरतर्फे ३ व ४ जून रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन ३ रोजी सकाळी १० वाजता पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी महापौर नलिनी चंदेले, ब्रिजधाम आश्रमचे संस्थापक ब्रिजमोहन फोफलिया, माजी नगरसेवक लालचंद वाधवानी, डॉ. नितीन तोष्णीवाल आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मोफत मेंबरशीप कार्डचे रुग्णांना वाटप येणार आहे.

या शिबिरात फिजिओथेरपी,
ऑस्टिओथेरपी आयुर्वेद व मोफत तपासणी करण्यात येणार आहे. हाडांच्या, मणक्यांच्या आणि सांध्यांच्या कोणत्याही प्रकारच्या आजारांवर यू. के. ऑस्टिओपॅथीद्वारे विना शस्त्रक्रिया, रामबाण उपचार हे सेंटरचे वैशिष्ट्य आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी रुग्णांनी ९५६११७१८८८ आणि ८३७९८९४९९४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिलिंग हॅण्डसचे प्रमुख डॉ. विनोद रोडा व डॉ. नेहासिंह रोडा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *