Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH 13 News Network

    इमेज वेल्फ़ेर अचिव्हर्स फोरम
हि संस्था गेल्या २३ वर्षापासून देशातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-यांना सन्मानीत करते.उदा. पं.जसराज, भारततत्न लता मंगेशकर, सुरेश वाडकर गायक तसेच सिंधुताई सपकाळ, अनुराधा पौडवाल, अनुप जलोटा, श्रीमती सिमा पेडणेकर, पद्मश्री अमिन सयानी, डॉ. संजय पाटील कॉर्डीलॉजीस्ट, दिलीप जोशी (तारक मेहता का उल्टा चष्मा), रमेश देव इत्यादी जणांचा सन्मान करण्यात आला आहे. सोलापुरातील कार्य कुशल अधिकारी संजय धनशेट्टी यांना यंदाच्या वर्षीचा हा मानाचा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती श्रीशैल लातूरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि. १४.फेब्रुवारी  रोजी संस्थेचे अध्यक्ष योगाचर्य नितीन विरकर, श्रीमती मथुरा पंडीत जसराज, श्रीमती रुपाली अंबुरे (डीसीपी ठाणे), डॉ. विजय शुक्ला (Vice president Lokmat), श्री कल्पना सरोज, पं. अजय मोहनकर, प्रशांत दामले (प्रसिध्द नट), यशपाल शर्मा (प्रसिध्द नट). अशिश चटर्जी (प्रसिध्द नट), श्री श्रीशैल लातूरे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक महाराष्ट्र हास्य जत्राची टीम असे उपस्थित होते.

संजय धनशेट्टी यांना त्यांच्या एकूण प्रशासकिय सेवेत केलेल्या कार्याबद्दल देशपातळीवरील पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कार्यकारी अभियंता म्हणून शासनाचा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *