Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

सांगली गुन्हे शाखेची धडक कारवाई

 

सांगली जिल्हयात एकाच रात्रीत सलग मेडीकल, हॉस्पिटल व बंद घराची कुलूपे तोडुन होणाऱ्या अव्हानात्मक चोरीच्या गुन्हयांबाबत मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठक घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.

 

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिंदे व अमलदार यांचे एक पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.

 

नमुद पथकाने सांगली जिल्हयातील एकाच रात्रीत अनेक मेडीकल, हॉस्पिटल व बंद घरे फोडुन झालेल्या गुन्हयाच्या ठिकाणी भेटी देऊन, रात्रीची गस्त ठेवत गुन्हयाचा तपास अविरतपणे चालु केला असता सांगली जिल्हयामध्ये तसेच बाजुच्या सातारा व कोल्हापुर जिल्हयामध्ये अशा प्रकारचे काही गुन्हे घडले आहेत तसेच या घटना लोकवस्तीत बाजार पेठेमध्ये घडत असल्याने पोलीसांची व नागरीकांची गस्त घालण्यात येत होती. या काही दिवसांचे अंतराने वारंवार होणाऱ्या व त्यामध्ये बंद मेडीकल व हॉस्पीटल यांना निशाण्यावर ठेवुन होणाऱ्या गुन्ह्याबाबत  माहिती घेऊन सर्व घटनास्थळी भेटी देऊन गुन्हयांची पद्धत व अभिलेखावरील आरोपींबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली तसेच घटनास्थळावरून व साक्षीदाराकडुन मिळाले माहीती वरून या प्रकारचे गुन्हे ही एकच व्यक्ती करत असल्याचे दिसुन आले. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या अभिलेखावरील गुन्हेगारांची तसेच जेल रिलीज आरोपीबाबतची माहिती उपलब्ध करून त्यांना चेक केले असता,

 

दिनांक १४/०३/२०१३ रोजी पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की, अशा प्रकारचे गुन्हे करणारा एक इसम हा टिव्हीएस कंपनीच्या पांढरे रंगाच्या दिना क्रमांकाच्या दुचाकी मोटर सायकल वरून चोरीचे सोने विक्री करणेकरीता सांगली माधवनगर बायपास परिसरात येणार आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा रचुन रमेश रामलिंग तांबारे वय ४६ वर्षे रा. दत्तनगर ता. पलूस जि. सांगली यास दुचाकी वाहनासह ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे पँटच्या खिशात सोन्याचे दगिने तसेच त्याचे गाडीची डिग्गी उपटुन पाहिली असता त्यामध्ये पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने व चांदीची भांडी व एक ८० हजार रू किमतीचे रिव्हॉल्वर असे एकुण १६ तोळे वजनाचे सोने व १ किलो ३५५ ग्रॅम वजनाची असा एकुण, १०,३७,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळून आला मुद्देमालाबाबत त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याने सदरचे दगिने हे काही दिवसापुर्वी वडगांव जि. कोल्हापुर, कर्नाळ जि. सांगली, येडे निपाणी जि. सांगली, सोनी जि. सांगली तसेच रिव्हॉल्वर हे दोन वर्षांपूर्वी शिरगांव ता. तासगांव जि.सांगली येथून रात्रीचे वेळी बंद घरे, मेडीकल दुकाने व हॉस्पीटल मधुन कुलूप तोडुन चोरी केल्याचे सांगीतले सदरबाबत खात्री केली असता संबंधीत पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

 

तपासी अधिकारी सपोनि संदिप शिंदे यांनी नमुद आरोपीस दि.१५/०३/२०२३ रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं ६५/२०२३ भादंविस ४५७, ३८०, ५११ या गुन्हयामध्ये अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दि.२०/०३/२०२३ रोजी पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे..

आरोपीकडे पोलीस तपासामध्ये कौशल्यपूर्ण सखोल तपास केला असता, त्याने मिरज ग्रामीण, तासगांव, कुरळप, सांगली ग्रामीण, इस्लामपुर, कासेगांव, बडुज, पेठवडगांव, जयसींगपुर या पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या दिवशी एकाच रात्री सलग मेडीकल, हॉस्पीटल व बंद घरे फोडुन अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याचेकडुन दाखल गुन्हयातील मुद्देमाल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्याराबाबत चौकशी करता,त्याने सांगीतले की गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे व काही मुद्देमाल हा त्याच्या शेतातील खोलीमध्ये ठेवला आहे. यातील घरफोडी गुन्हयातील सोन्याचे काही दागिणे हे ओळखीच्या सराफाकडे गहाण ठेवले असल्याबाबत सांगितले.

त्याप्रमाणे वरील पथकाने सदर ठिकाणी जाऊन पंचासमक्ष वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे त्यामध्ये कटावणी, कटर, मारतुल, टॉर्च, मास्क, जर्कीन, पोर्टेबल वजन काटा जप्त केला तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल त्यामध्ये सोन्याचे ४८ तोळे वजनाचे दागीने ७२५ ग्रॅम चांदीचे दगिने, चांदीची भांडी व चोरीतील रोख रक्कम ७० हजार असा एकुण मुद्देमाल वरील ठिकाणाहून व साक्षीदार यांचेकडुन हस्तगत केला.

जप्त मुद्देमाल त्यामध्ये ६४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २ किलो ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व भांडी, ८०,०००/- एक रिव्हॉल्वर, टिव्हीएस मोपेड मोटरसायकल व रोख रक्कम ७३,५००/- असा एकुण ३६,३१,०००/- रु चा मुद्देमाल आरोपीकडुन हस्तगत केला आहे. अद्यापपर्यंत नमुद आरोपीने सांगली, कोल्हापुर व सातारा या जिल्हयात विविध १६ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

 

सदरचा आरोपी हा प्रथमच अभिलेखावर आलेला असुन गुन्हा करताना कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे सोडत नव्हता. पथकाने अतिशय कौशल्यपूर्ण अहोरात्र तपास करून आरोपीबाबत अत्यंत कौशल्याने तपास करून माहिती काढून त्यास जेरबंद केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *