Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

        जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी डॉ. यासुकाटा यांनी जपान केंद्र सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले.

      यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, जपानचे कॉन्सुल मोरी रायको, कनेको टोशीहिरो, जपान कॉन्सुलेट जनरलचे राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी उपस्थित होते.

        यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि डॉ. यासूकाटा यांच्यामध्ये भारत-जपान संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक दृढ होण्याविषयी चर्चा झाली.

        उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या कामात जपानचे मोठे योगदान आहे. जपानच्या तंत्रज्ञानाचा ठिकठिकाणी वापर होत असून या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत. जपानची जनता आणि सरकारचा आम्ही नेहमीच आदर करीत आलो आहोत.

      डॉ. यासुकाटा यांनी यावेळी जपान केंद्र सरकारच्या वतीने श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले, मार्च २०२४ अखेर कधीही सात दिवसांचा दौरा केला जाऊ शकेल. या काळात विविध जपानी कंपन्यांना भेटी देता येणार आहेत. याचदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण, भारतीय समुदायांशी भेटी घेण्याचे नियोजन आहे. २०१२ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही जपान भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. सध्या भारतातून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान दौऱ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती डॉ. यासुकाटा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *